लांजा : वेरळ येथील शेतकऱ्यांना मसाले, नारळ रोपांचे वाटप

लांजा : लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड लांजा व प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये आणि टेक्नो सर्व्हर यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा तालुक्यातील वेरळ येथे अनुसूचित जाती घटकांमधील सभासद शेतकऱ्यांना दालचिनी व नारळ रोपांचे वाटप करण्यात आले.

लांजा तालुक्यात सध्या बागायतदार शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत असून, शासनाकडून शेतकऱ्यांना विविध अनुदान दिले जात आहे. नुकताच वेरळ येथील शेतकऱ्यांना रोपांचे वाटप कार्यक्रम पार पडला. लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसार कंपनी शेतीपूरक विविध उपक्रम राबवत आहे. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये आणि टेक्नो सर्व्हर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना मसाले व नारळ रोपांचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम डॉ. किरण मालशे (कृषी विद्यावेत्ता नारळ संशोधन केंद्र, रत्नागिरी) यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आनंद हणमंते (कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र लांजा), संतोष वानखेडे, डॉ. सुनील घवाळे (संशोधन अधिकारी) यांनी नारळ व मसाले वृक्ष लागवडीबाबतीत मार्गदर्शन केले. लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन आनंद कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जयेश माजळकर, सरपंच सुवर्णा जाधव, भीमदास जाधव, सुमीत जाधव, रितेश पांचाळ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:12 PM 25/Sep/2024