शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी मध्ये स्वादुपिंडातील स्यूडोसिस्टची यशस्वी शस्त्रक्रिया

रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे स्वादुपिंडातील स्यूडोसिस्ट असलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेचे नाव सिस्टोगॅस्ट्रोमी असे आहे. ही शस्त्रक्रिया डॉ. मनोहर कदम ( विभाग प्रमुख शल्यचिकित्सकशास्त्र) आणि डॉ. सुश्रुत तेंडूलकर एशल्यचिकित्सकशाख यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आली.

११ सप्टेंबर २०२४ रोजी जितेंद्र कांबळे (वय ३५ वर्) या रुग्णावरत्ती करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेत स्यूडोसिस्ट आणि पोटामध्ये मार्ग करुन सिस्टचे सुरक्षित निचरा सुनिश्चित करण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी मा. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचे मार्गदर्शन लाभले. हि शस्त्रक्रिया कोणत्याही अडचणीविना पार पडली आणि रुग्णांची स्थिती आता स्थिर आहे.

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी या यशस्वी उपचारासाठी समाधान व्यक्त केले तसेच त्यांनी डॉक्टारांच्या कुशलतेचे आणि रुग्णालयाच्या उत्कृष्ट सेवांचे कौतुक केले आहे. डॉ. मनोहर कदम (विभाग प्रमुख शल्यचिकित्सकशास्त्र) आणि डॉ. सुश्रुत तेंडूलकर शल्यचिकित्सकशास्त्र यांनी या प्रकारच्या आजाराचे लवकर निदान आणि योग्य वेळी उपचार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्वादुपिंडातील स्यूडोसिस्ट जर योग्य वेळी उपचार न मिळाले तर धोकादायक ठरु शकते. परंतु आधनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियांच्या मदतीने रुग्ण संपूर्णपणे बरे होऊ शकतो. रुग्णाचे लवकरात लवकर संपुर्ण आरोग्य प्राप्त होईल असा विश्वास डॉक्टारांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:22 25-09-2024