पशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट कार्डची सुविधा

रत्नागिरी : केंद्र शासनाने सन २०२४- २५ या आर्थिक वर्षापासून पशुसंवर्धनविषयक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. योजनेंतर्गत विहित मुदतीत व नियमित झाल्यास नाबार्डकडून ३ टक्क्यांपर्यंत व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेत पशुधन असलेल्या लाभार्थ्याला ४ टक्के दराने पुढील देखभालीसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. हे कॅश क्रेडिट दोन लाखांपर्यंत ७ टक्के व्याजाने व २ लाखांवरील कर्ज ११ टक्के कर्ज स्वरूपात पशुपालकाला प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 25/Sep/2024