सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट

चिपळूण : सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन वाढवून ते सध्याच्या रकमेच्या दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तसेच ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करत ग्रामपंचायत अधिकारी पदाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी बनले आहेत. त्यामुळे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवक संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली झालेल्या राज्य प्रस्तावाला मान्यता मिळाली. सरपंच व उपसरपंचांचे सध्याचे मानधन त्या त्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन ३ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये होणार आहे तर उपसरंपचांचे मानधन १ हजार रुपयांवरून २ हजार रुपये होईल. लोकसंख्या ८ हजारांपेक्षा अधिक आहे. तेथील सरपंचांचे मानधन १० हजार आणि उपसरपंचांचे मानधन ४ हजार होईल. त्याचबरोबर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील करण्यासही मान्यता दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:11 PM 26/Sep/2024