Rain Alert : फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा इशारा.. ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather 2024
Maharashtra Weather 2024

मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती अजूनही कायम आहे. तर पश्चिम बंगालच्या खाडीत तमिळनाडू, पदुचेरीजवळ फेंगल चक्रीवादळाचं सावट आहे. हे चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दक्षिण भारतात वादळी वारे, गारा आणि अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार झाल आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूसहित देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतोय. या चक्रीवादळाला फेंगल असे नाव देण्यात आले आहे. या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे. राज्यातील बहुतांशी भागात उद्या ढगाळ हवामान तयार होऊ शकते. एवढेच नाही तर सहा डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात 3 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव परिसरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मोहर गळून पडण्याचं टेन्शन आहे. दुसरीकडे उत्तरेकडून गार वारे वाहात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोल्ड वेव अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात कडाक्याची थंडी पडली असून अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरला. मुंबईत 16.5 अंश सेल्सिअस तापमानात नोंदवलं गेलं असून पुण्यात तापमानाचा पारा 9.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे मुंबईत गारठा वाढला आहे. शुक्रवारी सांताक्रूझमध्ये १६.५ अंश तर कुलाबा येथे २१.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान आहे.

राज्यात निफाडमध्ये पारा 6 अंशापर्यंत घसरला.. या परिसरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. दरम्यान राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात थंडीची तिव्रता अधिकाधिक वाढल्यानं पुणेकर चांगलेच कुडकुडलेत. शिवाजीनगरचे किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरलंय.. त्यामुळे पुणेकरांनी उबदार कपड्यांना पसंती दिलीय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 30-11-2024