रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीत सॅटर्डे क्लब, श्री दर्या सागर पर्यटन व सेवा सहकारी संस्था, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, निसर्गयात्री, असीमित व अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘अथांग ते उत्तुंग’ हा कार्यक्रम २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात वारसास्थळ संवर्धन सल्लागार तेजस्विनी आफळे, लेखक आणि साहसी पर्यटनाचे महाराष्ट्रातले प्रणेते वसंत लिमये, पितांबरी उद्योग समुहाचे संचालक रवींद्र प्रभुदेसाई, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, सॅटर्डे क्लबचे वेबसाईड सेल हेड गिरीश घुगरे आणि कोकण रिजन हेड राम कोळवणकर, इन्फिगो आय हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर आदी मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्याला निसर्ग, इतिहास आणि परंपरा यांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातली ९ ठिकाणे जागतिक वारसास्थळांच्या संभाव्य यादीत नोंद होताहेत. यातून पर्यटनाच्या नवीन संधी आणि व्यवसायाची नवीन दालने उघडणार आहेत. सर्व पर्यटनप्रेमी, व्यावसायिक आणि पूरक व्यावसायिक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:37 PM 26/Sep/2024