दापोली : शिरसोली नं 1 शाळेत शस्त्र ओळख व प्रात्यक्षिक कार्यशाळा

दापोली : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरसोली नं 1 या शाळेत विद्यार्थी सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत शस्त्र ओळख व प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस दापोली पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री. मिलिंद चव्हाण, श्री. विकास पवार, श्री. धनाजी देवकुळे व वाहतूक नियंत्रक श्री. प्रवीण क्षीरसागर उपस्थित होते. श्री. विकास पवार यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना विद्यार्थी सुरक्षेविषयी माहिती सांगितली, त्याचबरोबर सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक नियमांची माहिती दिली. तसेच श्री. धनाजी देवकुळे साहेब यांनी विविध शस्त्रांची ओळख करुन दिली.श्री.प्रवीण क्षीरसागर साहेब यांनी वाहतूक नियमांची माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:27 PM 04/Dec/2024