गुहागर : शृंगारतळीत ७ डिसेंबर रोजी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर

गुहागर : देवस्थळी हॉस्पिटल चिपळूण, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट शृंगारतळी व ए. एस. जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांच्यावतीने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार ७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत ए.एस.जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्युट, कॅनरा बँकेच्यावर, शृंगारतळी येथे करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये चिपळूणचे अस्थिरोग व सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. कौस्तुभ देवस्थळी आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. संजिता देवस्थळी रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध असणार आहेत. यावेळी डॉ. कौस्तुभ हे गुडघे दुखणे, सांध्यातून आवाज येणे, हाडांमधील कॅल्शिअमची कमतरता, सांध्यावर सूज, सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, सायटीका, संधीवात इ. आजारांनी त्रस्त असणाऱ्या रूग्णांना तपासून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. संजिता देवस्थळी या नवजात बाळांपासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांपर्यंत सर्दी, ताप, एलर्जी, बालदमा, न्यूमोनिया, झटक्याचे आजार, कमी वजनाचे बाळ, हृदयरोग अशा आजारांवर तपासणी केली जाणार आहे. आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रुग्णांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 05/Dec/2024