रत्नागिरी : भाट्ये बिच आणि मिरजोळे येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; तिघांवर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील भाट्ये बिच आणि मिरजोळे येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ७ वा. कालावधीत करण्यात आली आहे. रोहन अप्पासाहेब पाटील (२८, रा. करवीर, कोल्हापूर), अमोल मोहन शेलार (३६, रा. करवीर, कोल्हापूर) आणि करण राजरत्न जाधव (२९, रा. मूळ रा. संगमेश्वर सध्या रा. शांतीनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 09/Dec/2024