निवृत्ती वेतन व लाभांसंबंधी होणार चर्चा; जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
रत्नागिरी: Ratnagiri Pensioners Melava संदर्भात प्राप्त माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारकांचे (पेंशनर्स) निवृत्ती वेतन आणि इतर थकबाकी अथवा सेवांतर्गत लाभ देण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पार पडणार आहे.
निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांवर होणार मंथन या मेळाव्यात निवृत्ती वेतनधारकांना येणाऱ्या अडीअडचणी, वेळेवर निवृत्ती वेतन मिळणे, बँकेशी संबंधित समस्या आणि इतर लाभांचे वितरण या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
बँक व्यवस्थापक अन् संघटना प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरीतील सर्व निवृत्तीवेतनधारक, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि संबंधित बँकांचे व्यवस्थापक (Bank Managers) यांनी या मेळाव्यास वेळेवर उपस्थित राहावे, असे अधिकृत आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 31-07-2026














