लांजा : रिंगणे शाळा परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

लांजा : लांजा तालुक्यातील श्री दत्त प्रासादिक हांदे आणि मंडळी या मंडळाच्या माध्यमातून सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रिंगणे शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे शालेय परिसरावर कॅमेराच्या निगरानिखाली रहाणार आहे.

दत्त प्रासादिक हांदे आणि मंडळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुभाष हांदे, सरचिटणीस सुरेश हांदे, सल्लागार रवींद्र हांदे यांच्यासह स्थानिक मंडळाचे अध्यक्ष युवराज हांदे, सरचिटणीस विनोद हांदे यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या भरघोस देणगीमुळे सीसीटीव्ही बसविण्याचे खर्चिक काम शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेत एकप्रकारे वाढ झाली आहे. बदलापूर येथील शाळेत बालिका अत्याचार घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुशिक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे रहिले. त्या दृष्टीने सतर्क होऊन विद्यार्थी सुरक्षितता करण्याच्या उद्देशाने शासनाकडून राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर रिंगणे विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. कार्यरत संस्थे – समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी येणाऱ्या मोठ्या खर्चामुळे निधी उपलब्ध करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. अखेर गावातील श्री दत्त प्रासादिक हांदे आणि मंडळी या मंडळाने पुढाकार घेतला व सर्व प्रथम मंडळाच्यावतीने कार्यकर्त्यांना देणगीसाठी आवाहन करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही उस्फूर्तपणे प्रतिसाद देत भरघोस अशी आर्थिक मदत देणगी स्वरूपात मंडळाकडे जमा केली. याच मदतीच्या माध्यमातून सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रिंगणे येथे सीसीटीव्ही बसविण्याचे खर्चिक असे काम श्री दत्त प्रासादिक हांदे आणि मंडळी या मंडळाने पूर्ण केले आहे.

दरम्यान, देणगी जमिवण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या या प्रक्रियेत मंडळातील प्रशांत हांदे, उदय हांदे, स्वप्नील हांदे, प्रवीण हांदे, राजेंद्र हांदे, प्रकाश हांदे, नामदेव चंदुरकर, सुरेश हांदे संतोष हांदे, रघुनाथ हांदे व विजय हांदे या मंडळाच्या कार्यकत्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 27/Sep/2024