◼️ रूग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची भेट घेऊन केली विचारपूस
◼️ घटनेची सखोल चौकशी करण्याची प्रशासनाला सूचना
◼️ ‘कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे’ : उदय सामंत
रत्नागिरी : जयगड येथील जिंदाल कंपनीतून वायुगळती झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला. अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेकांची प्रकृती बिघडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे झालेल्या त्रासाची गंभीर दखल घेत आज शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत मुंबईहून तातडीने रत्नागिरीकडे रवाना झाले. श्री. उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचून रूग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. डॉक्टरांकडून विद्यार्थ्याच्या आरोग्याची माहिती घेतली. तसेच उदय सामंत यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे सूचना प्रशासनाला दिल्या व भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उदय सामंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत भूमिका मांडली आहे. “अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली गेलीय. आजच केस दाखल केली जाईल. निष्काळाजीपणामुळे वायूगळती झाली. कंपनीने दिलेली आश्वासन आणि त्याची परिपूर्णता याचा अहवाल देखील समितीने द्यावा. कंपनीकडून काय मिळते याबाबत नागरिकांनी देखील सजग राहावे. कंपनीकडून सुसज्ज हॉस्पिटल होईल यासाठी ग्रामस्थांनी सजग पाहिजे. ग्रामस्थांचा कोणताही गैरफायदा कंपनी उठवू नये यासाठी समिती स्थापन केली आहे. कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. कंपनीच्या मालकाने देखील कधीतरी रत्नागिरीमध्ये यायला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये कंपनी दोषी आहे”, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 13-12-2024














