इस्लामपूर : इस्लामपूर व शिराळा येथील हिंदू जनआक्रोश मोर्चावेळी झालेल्या सभांमधून मुस्लिम समाजाबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी आ. नीतेश राणे यांच्याविरोधात इस्लामपूर, शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शिराळा पोलिस ठाण्यात पोलिस सचिन कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
इस्लामपुरात २९ ऑगस्टरोजी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला होता. मोर्चानंतर यल्लम्मा चौकात आ. राणे यांची सभा झाली होती. सभेत त्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचे तांबोळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. १९ सप्टेंबररोजी शिराळा येथे अंबामाता मंदिर ते जुने तहसील कार्यालय या मार्गावरून हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला होता.
अन्यथा आंदोलन
आ. नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजाविषयी अत्यंत जहाल भाषेचा वापर करून दोन समाजामध्ये तणाव निर्माण होईल, असे भाषण केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये ३५३ (२) (दोन समुदायामध्ये तेढ निर्माण करणे) या कलमाची वाढ करावी; अन्यथा जिल्हा पोलिसप्रमुख यांच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र संघर्ष समितीचे शाकीर तांबोळी, दिग्विजय पाटील, सुधीर कांबळे यांनी दिला होता. त्या आशयाचे निवेदन पोलिस अधीक्षकांना दिले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 28/Sep/2024