रत्नागिरी : जिंदल पोर्ट परिसरात झालेल्या वायू गळतीमधील परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ४२ बाधितांपैकी ३९ जणांना काल सोडण्यात आले. ३ विद्यार्थी अजून उपचार घेत असून, आज त्यांना सोडण्यात येणार आहे. श्वसनाचा, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या होणे या लक्षणावरच उपचार करून सोडण्यात आले.
जिंदल पोर्ट कंपनीत झालेल्या वायू गळतीमुळे संपूर्ण तालुका हादरला. सुमारे ८० ते ९० विद्यार्थ्यांना वायू गळतीची बाधा झाली. ७० विद्यार्थ्यांवर उपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते; परंतु घरी गेल्यानंतर पुन्हा काही विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे १२ तारखेपासून परवापर्यंत येथील परकार हॉस्पिटलमध्ये ४२ मुलांना पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर काल ३९ मुलांना सोडण्यात आले.
मुलांना नेमका कशामुळे हा त्रास झाला, हे अजूनही सांगण्यात आलेले नाही. त्यांना होणाऱ्या श्वसनाचा, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या या लक्षणावरच उपचार करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 20/Dec/2024














