केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा

ल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताच्या राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राज्यघटनेच्या अनुच्छेद ७५ च्या खंड (२) अंतर्गत, जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला आहे.

जॉर्ज कुरियन हे केरळ भाजपचे मोठे नेते आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्यसभेत आणण्यात आले होते. २१ जून रोजी त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे.

तत्पूर्वी, जॉर्ज कुरियन यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात येणार नाही, असे संकेत बाजपने यापूर्वीच दिले होते. पक्षाने जॉर्ज कुरियन यांच्या जागी मध्य प्रदेशातील भाजप नेते तथा सरचिटणीस तरुण चुग यांना राज्यसभेचे तिकीट दिले होते. भाजपने १८ जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी रवनीत सिंह बिट्टू आणि कुरियन या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली नव्हती.

६५ वर्षीय जॉर्ज कुरियन हे ऑगस्ट २०२४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या सरकारमध्ये राज्यमंत्री (MoS) म्हणून कार्यरत होते. ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते १९८० पासून अर्थात भाजपच्या स्थापनेपासूनच पक्षाचे सदस्य आहेत. मोदी मंत्रिमंडळात कुरियन यांच्याकडे मत्स्यव्यवसाय, पशुपालन तथा दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणूनही अतिरिक्त जबाबदारी होती. महत्वाचे म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळात ख्रिश्चन समुदायातून येणारे ते एकमेव मंत्री होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 23-06-2026