सहकार व्यवस्थापन पदविका डीसीएम सत्र दहा ची परीक्षा यशस्वीरित्या संपन्न

रत्नागिरी :- महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांचे मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13 प्रशिक्षण केंद्रामध्ये सहकार व्यवस्थापन पदविका सत्र 10 ची परीक्षा घेणेत आली. त्यापैकी कोल्हापूर येथील तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्र मार्केट यार्ड येथील प्रशिक्षण केंद्रात दिनांक 20 ते 22 जून 2026 या तिन्ही दिवशी यशस्वीरित्या पार पडली.

या परीक्षेला कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आजी-माजी असे एकूण 74 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 69 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेच्या समारोप समारंभ प्रसंगी राज्य सहकारी संघाचे संचालक श्री धनंजय शेडगे तसेच संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कुमार दराडे व संघाच्या संचालिका सौ नलावडे मॅडम व श्री मुकुंद पवार उपस्थित होते. तसेच संघाचे लेखा विभागाचे मुख्याधिकारी श्री एस एस बोडके हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की सहकारी चळवळीमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा याकरिता अशा प्रकारच्या परीक्षा देऊन आपल्या संस्थेचे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने तसेच कायद्यातील तरतुदीप्रमाणे करावे. याप्रसंगी श्री बोडके दिनांक 30 जून 26 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सत्कार सर्वांच्या वतीने श्री महालक्ष्मीची मूर्ती देऊन करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी प्राचार्य श्री एस .एस ढेरे या केंद्रातील प्राचार्य श्री ए.आर .कळंत्रे तसेच उपप्राचार्य श्री एस. टी जाधव व श्री बी .पी .घाटगे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बोर्डाचे जिल्हा सहकार विकास अधिकारी श्री एम .आर. पांचाळ तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाचा सर्व स्टाफ व या केंद्रातील सर्व स्टाफ उपस्थित होता.

Radhakrushna patapedhi

ही परीक्षा यशस्वी करणेसाठी जिल्हा उपनिबंधक श्री निळकंठ करे यांनी मोलाचे सहकार्य केले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष श्री प्रवीण भाऊ दरेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक्षण केंद्रातील सर्व स्टाफ चे परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 23-06-2026