रत्नागिरी : भाट्ये-मुरकरवाडी येथे सामाईक जमीन वादातून मारहाण

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये-मुरकरवाडी येथे सामाईक जमिनीच्या वादातून शिवीगाळ व दगड, काठी फेकून मारणाऱ्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमाकांत नारायण पिलणकर (वय ७७) गणेश रमाकांत पिलणकर, ओंकार रमाकांत पिलणकर (सर्व रा. भाट्ये-मुरकरवाडी, रत्नागिरी) अशी एका बाजूची संशयितांची नावे आहेत.
ही घटना रविवारी (ता. २२) दुपारी भाट्ये मुरकरवाडी येथे घडली. फिर्यादी संशयित नातेवाईक असून, जमिनीवरून त्यांचे वाद आहेत. रविवारी दुपारी फिर्यादी यांच्या वहिवाटेप्रमाणे संशयित रमाकांत हे फिर्यादी यांच्या जागेमध्ये जाण्यासाठी असलेल्या वाटेमध्ये संशयित गणेश पिलणकर हे चिऱ्याचे बांधकाम करत होते. याबाबत फिर्यादी यांनी त्याला विचारले असता संशयितांनी फिर्यादी यांना मारहाण करून शिवीगाळ केली. संशयित रमाकांत पिलणकर यांनी काठी व दगड फेकून मारला. याप्रकरणी फिर्यादी गणेश पिलणकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गणेश व संशयित महिला हे एकमेकांचे नातेवाईक असून ते त्याच्या जमिनीत असलेल्या कंपाऊंडच्या गडग्याचे काम करत होते. संशयित महिला व ऋचीर महेश पिलणकर (२०, दोघे रा. भाट्ये, रत्नागिरी) हे तेथे येऊन वाद घातला व आई-वडिलांवरून शिवीगाळ केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 24/Dec/2024