चिपळूण : येथील वाशिष्ठी डेअरीतर्फे ५ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत चिपळुणात कृषी महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये ६ जानेवारीला सुदृढ, निरोगी, सुंदर पशुधन व ८ रोजी जास्त दूध देणारी म्हैस व गाय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील पशुधन मालकांना आकर्षक बक्षीस, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. गतवर्षी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामध्ये १०० पशुधन सहभागी झाले होते.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे बहादूरशेखनाका येथील पालिकेच्या सावरकर मैदानात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. ६ रोजी सुदृढ, निरोगी, सुंदर पशुधन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त दूध देणारी म्हैस, सर्वात जास्त दूध देणारी गाय, सुदृढ निरोगी सुंदर बैल, सुदृढ निरोगी सुंदर गाय, सुदृढ निरोगी सुंदर म्हैस, सुदृढ निरोगी सुंदर रेडा, सुदृढ निरोगी सुंदर गाय वासरू, सुदृढ निरोगी सुंदर म्हैस वासरू अशी ही स्पर्धा होईल, तर ८ जानेवारी रोजी जास्त दूध देणारी गाय व म्हैस स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेत्या पशुधन मालक प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये, तृतीय ५ हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 24/Dec/2024












