रत्नागिरी : दामले विद्यालयाने सादर केलेल्या ‘दहा वजा एक बरोबर शून्य’ बालनाट्याने जिंकली रसिकांची मने

रत्नागिरी : पुणे येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय बालनाट्य महोत्सवात शहरातील दामले विद्यालय नगर परिषद शाळा क्रमांक १५ ने सादर केलेल्या ‘दहा वजा एक बरोबर शून्य’ या बालनाट्याने रसिकांची मने जिंकली. बालरंगभूमी परिषद २० ते २२ डिसेंबर या कालावधीत हे संमेलन आयोजित केले होते.

अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम, विबवेवाडी, पुणे येथील सुधाताई करमरकर मुख्य रंगमंचावर शिक्षक योगेश कदम लिखित व शाहबाज गोलंदाज दिग्दर्शित ‘दहा वजा एक बरोबर शून्य’ या बालनाट्याचा निमंत्रित संघ म्हणून प्रयोग सादर झाला. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेने राज्यस्तरावर प्रथमच अशा बालनाट्यसंमेलनाचे आयोजन केले होते.

कमी पटसंख्येअभावी बंद पडत जाणारी मराठी भाषा वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या बालदोस्तांचा आणि त्याच्या गुरुजींचा प्रवास बालनाट्यातून मांडण्यात आला आहे. बालनाट्याच्या या चमूचे मुख्याध्यापक भगवान मोटे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ व माता पालक संघ यांनी विशेष कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 24/Dec/2024