राजापूर : येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
धन्वंतरी धर्मादाय संस्था रत्नागिरी आणि वैभवलक्ष्मी रक्तपेढी कोल्हापूर यांच्या सहकायनि राजापूर हायस्कूल येथे हे शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मधुकर देवरूखकर आणि धन्वंतरी धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष अजय भिडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी रमेश गुणे, जितेंद्र मालपेकर, अनंत रानडे, आ. के. मराठे, दत्तात्रय रानडे, विनायक बेडेकर, अड. राजन देवरूखकर, सुभाष पवार, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष दिनानाथ कोळवणकर आदींसह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या शिबिरात सहा. पोलीस निरीक्षक सुधीर उबाळे, सतिश तिष्ठक, मुख्याधिकारी चेतन विस्पुते, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, दिनानाथ कोळवणकर, हिंदू जनजागृती समितीचे विनोद गादीकर, महेश मयेकर, अॅड. प्रशांत पाध्ये, डॉ. अभय अळवणी आदींसह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, महावितरण, एसटी विभागातील कर्मचारी तसेच महिला, तरुणांनी उपस्थित राहत रक्तदान केले. या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 24/Dec/2024












