लांजा : ग्रामीण भागातील युवकांमध्ये कलाकौशल्य पहायला मिळते. त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार. विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांच्या पाठीशी राहणार असल्याचे प्रतिपादन आ. किरण सामंत यांनी लांजा तालुक्यातील कोचरी गावामध्ये केले. लांजा तालुक्यातील कोचरी येथे कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक म्हणून आ. किरण सामंत उपस्थित होते.
यावेळी ते खेळाडूंना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, प्रसाद माने, सुजित आंबेकर, चेतन खंदारे, बापू लोटणकर, परशुराम गुरव, प्रकाश बेंद्रे, सुरज बने, संदेश कांबळे, मयूर कांबळे, यश सनगळे, शुभम बेंद्रे आदी उपस्थित होते.
भविष्यातील येणाऱ्या काळामध्ये लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्रांमध्ये युवकांसाठी पुढाकार घेऊन काम करणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. त्यांच्याहस्ते कबड्डी स्पर्धेचे श्रीफळ वाढून उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेला पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व कबड्डीप्रेमी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 24/Dec/2024












