रत्नागिरी परीट समाजातर्फे श्री विठ्ठल मंदिरात श्री गाडगेबाबा पुण्यतिथी उत्साहात साजरी

रत्नागिरी : येथील श्री विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचा ६८ वा पुण्यतिथी उत्सव उत्साही वातावरणात साजरा झाला.

यावेळी झालेल्या मेळाव्याला ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर कासेकर अध्यक्षस्थानी होते.

ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत मस्के, मधुकर कदम, सौ. कल्पना नाचणकर, महिला मंडळ अध्यक्ष सौ.संगीता कासेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्री.व सौ. सुषमा प्रभाकर कासेकर आणि श्री. व सौ. शिल्पा शशिकांत नाचणकर या ज्येष्ठ दाम्पत्यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. संत गाडगेबाबा नगर येथील संत गाडगेबाबा समाज मंदिराच्या नूतनीकरण कामात विशेष योगदान असलेले प्रीतम पावसकर यांचाही सत्कार करण्यात आला. या समाज मंदिरासाठी प्रसाद कासेकर यांनी भिंतीवरील घड्याळ भेट म्हणून मंडळाला दिले.

श्री गाडगेबाबांच्या जीवनावर बाल गटात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व, हस्तकला आणि चित्रकला स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेत कुमारी शिवन्या वीरेंद्र कोरगावकर, आर्यन प्रसाद म्हस्के, वेद नीलेश तवसाळकर, कुमारी हिरा अमित नेरकर यांना विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला.

सकाळी श्री गाडगेबाबा मूर्ती पूजनाच्या कार्यक्रमाचा मान श्री. राजेश कदम आणि सौ. संपदा कदम यांना देण्यात आला. त्यानंतर संजीवनी गुरुप्रसाद मंडळाच्या बालकलाकारांनी सुश्राव्य भजने सादर करून भक्त मंडळींची प्रशंसा मिळविली. सायंकाळी सतीश बुवा पांचाळ यांच्या भजनानंतर तसेच दत्तात्रय जोशी यांच्या भक्ती आणि भावगीत कार्यक्रमानंतर धुपारतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

संत गाडगेबाबा नगरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेतून समृद्धीचा संदेश देण्यात आला. या उपक्रमांच्या नियोजनात मंडळाचे पदाधिकारी जितेंद्र नेरकर, प्रसाद म्हस्के, सचिन म्हस्के, अमित कोरगावकर, सागर कासेकर आदींनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 24-12-2024