सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्यांवर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील थिबापॅलेस- ढेपसे घाटी व भाट्ये पावस रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर नुरुद्दीन सोलकर (वय ४८ रा. कर्ला, रत्नागिरी) व विनायक अनिल शिंदे (३६, रा. असुर्डे बनेवाडी, ता. चिपळूण. सध्या कारवांचीवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. २२) सायंकाळी सात ते आठच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिस नाईक निखिल माने यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:06 24-12-2024