ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे आज रक्तदान शिबिर

रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेना रत्नागिरी व शिवसेनेच्या वतीने बुधवार, दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

युवा सेनेच्या वतीने रत्नागिरी तालुक्यात ना. सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रम राबवले जात आहेत.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात रक्त साठ्याचा तुटवडा जाणवत असल्याने, एक सामाजिक जबाबदारी लक्षात घेत युवा सेनेने रक्तदान शिबिर आयोजित केले असून, बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत हे शिबिर होणार आहे.

या शिबिराला युवा सेनेसह शिवसेनेच्या सर्वच विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून ना. उदय सामंत यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन युवा तालुकाप्रमुख तुषार साळवी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 25/Dec/2024