दमा पीडित रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू

रत्नागिरी : दम्याच्या आजाराने गस्त असलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना सोमवार २३ डिसेंबर रोजी रात्री ११.१५ वा. सुमारास घडली. दीपक धनाजी भोसले (वय ५०, मूळ रा. गावडे आंबेरे, सध्या रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. दीपक भासले यांना गेल्या दोन वर्षांपासून दम्याचा त्रास होता. सोमवारी सकाळी ८ वा. सुमारास त्यांना थिबा पॅलेस येथे दम्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना रात्री ११.१५ वा. सुमारास त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 25/Dec/2024