रत्नागिरी : शहरातील नवीन भाजी मार्केट ते टॉकिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार २३ डिसेंबर रोजी ७.१५ ते ७.३० वा. कालावधीत करण्यात आली आहे. विकास दीपक पवार (वय ३४), अनिल कुमार (२३) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 25/Dec/2024












