जखमी कबड्डीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शहरालगतच्या मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी खेळताना मानेला गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला.

कबड्डी खेळताना झालेल्या या घटनेत कबड्डीपटूला जीव गमवावा लागल्याने क्रीडाप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मानस यशवंत आडविरकर (वय २३, रा. पूर्णगड, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मानसच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी मुंबई येथे हलविले होते. उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 25-12-2024