आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील आयुष आगरे, विक्रम घाग’ची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

देवरुख : शहरातील आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील आयुष आगरे (१२वी संयुक्त वाणिज्य) आणि विक्रम घाग (१२वी कला) यांची १९ वर्षाखालील ४ थ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ही राष्ट्रीय स्पर्धा मथुरा, उत्तर प्रदेश येथे दि. २७ ते दि. ३० डिसेंबर या कालावधीत आयोजित केल्या जाणार आहेत. आयुष आगरे आणि विक्रम घाग यांनी रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट संघातून खेळताना नाशिक येथील महाराष्ट्र राज्य स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. आयुष आगरे या संघामध्ये प्रमुख फलंदाज (बॅट्समन) तर विक्रम घाग जलदगती गोलंदाज (फास्ट बॉलर) असणार आहे.

त्यांचा महाविद्यालयात सत्कार करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, प्रा. सुवर्णा साळवी, कनिष्ठ विभाग जिमखाना प्रमुख प्रा. सानिका भालेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यशस्वी दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, शिरीष फाटक, अॅड. वेदा प्रभुदेसाई आणि राहुल फाटक यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 25/Dec/2024