अंगीकृत कलागुण ही यशाची पायरी : दिलीप मर्चेंडे

दापोली : क्रीडामहोत्सवातून मुलांचे अंगीकृत गुण दिसून येतात म्हणून अंगीकृत कलागुण ही यशाची पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन दापोली पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी दिलीप मर्चेंडे यांनी सांगितले.

दापोलीत दोन दिवस सुरू असलेल्या क्रीडामहोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षण विभागाचे नोडल अधिकारी रामचंद्र सांगडे, बळीराम राठोड, पद्मन लहांगे आदींच्या उपस्थितीत हा महोत्सव झाला. ही स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द असून, खेळाने शरीरयष्टी घडते. स्पर्धकांनी खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन करावे, असे आवाहन यावेळी दिलीप मर्चेंडे यांनी केले.

यावेळी कुंभवे शाळेने संचलन तर तेरेवायंगणी आणि गव्हे शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करत क्रीडास्पर्धेत ऊर्जा भरण्याचे काम केले. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या खेळाचा कल ओळखून त्याला जोपासण्यासाठी शिक्षकांनी सहकार्य केल्यास क्रीडाक्षेत्रात दापोलीचाही नावलौकिक वाढू शकेल, असे अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 25/Dec/2024

Gadre1