गावतळे : दापोली तालुक्यातील आर. जी. पवार माध्यमिक शाळा, टांगर शाळेच्या सन २०००-२००१ च्या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग तब्बल २५ वर्षांनी भरला. तीच इमारत, तोच वर्ग आणि शिक्षकही तेच. बालपणातील सर्व सवंगडी एकत्र यावेत, या उद्देशाने टांगर, गणपतीपुळे, आवाशी, शिरसोली, शिरशेश्वर, हातीप या गावातील माजी विद्यार्थ्यांनी शाळेत स्नेहमेळावा उत्साहात साजरा केला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत केले. सर्व आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकांनी शाळेच्या बाकावर बसून आपल्या शाळेच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. शाळेला तीन वॉटर प्युरिफायर, भिंतीवरील घड्याळ, टेबल मॅट, फ्रेम आदी भेटवस्तू या विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या तसेच याच शाळेतील याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी खो-खो खेळामध्ये मिळवलेले राज्यस्तरीय यशाचे स्मरण करत पुन्हा मैदानात खेळ अनुभवला आणि सर्वांसोबत स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 25/Dec/2024














