खेड : तालुक्यातील ऐनवली बौद्धवाडी येथील ३४ वर्षीय गुंजन गुरुदास जाधव यांचा घरातील गॅस लीक होऊन झालेल्या आगीत होरपळून गंभीर जखमी झाल्या होत्या. ही घटना दि. ७ नोव्हेंबर रोजी घडली होती.
त्यांना उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:40 25-12-2024














