वेरळ घाटात कंटेनर कलंडल्याने 3 तास वाहतूक ठप्प

लांजा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ घाटामध्ये बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एक डिझेलवाहू टँकर पलटी झाला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, महामार्गावरील अवघड वळणाचा अंदाज न आल्यामुळे कंटेनर महामार्गाच्या मधोमध कलांडल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

मात्र, हातखंबा येथील महामार्ग पोलिस व लांजा पोलिस यांच्या अथक प्रयत्नानंतर तीन तासानंतर या कंटेनरला बाजूला करण्यात यश आले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ घाटाच्या मध्यभागी कंटेनर कलंडला. सकाळी १० वाजता हा अपघात झाला. महामार्गावर हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होती. हातखंबा पोलिस व लांजा पोलिसांच्या मदतीने दोन क्रेनच्या सहायाने अपघातग्रस्त कंटेनरला बाजूला करण्यात आल्यावर खोळंबलेली वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान, या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या वेरळ घाटामध्ये रांगा लागल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 26/Dec/2024