रिक्टोली गावची सुकन्या सारा शिंदे राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणार

चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागातील रिक्टोली गावची सुकन्या सारा नंदकिशोर शिंदे हिची ५१व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी कुमारी गटाच्या संघाची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. ती रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.

२०२३ मध्ये झालेल्या किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी महिला संघाने उपविजेतेपद मिळविले होते. आता तिची रत्नागिरी जिल्हा कुमारी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. या बद्दल रामवरदायिनी देवस्थानचे अध्यक्ष प्रताप शिंदे, दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिंदे, दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे सरचिटणीस राज शिंदे व दसपटीमधील कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 26/Dec/2024

Tata motars punch