साळवी स्टॉप आणि आठवडा बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन; तीन तरुणांवर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप आणि आठवडा बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार २३ डिसेंबर व मंगळवार २४ डिसेंबर रोजी करण्यात आली.

वेदांत विनोद हटकर (२१, रा. शांतीनगर रसाळवाडी, रत्नागिरी), ऋषीराज रविंद्र मोरे (३४, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) आणि आर्यन मनोज गोसावी (२१, रा. शांतीनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 26/Dec/2024