गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेत शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त बुधवारी फळे व फुले खरेदीसाठी गर्दी झाली होती.
सध्या संत्री, मोसंबी, सफरचंद, द्राक्षे, केळी, पेरु, बोर अशा विविध फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच गुलाब, लाल व पिवळा झेंडू आदी फुलांची आवकही भरपूर आहे. त्यामुळे ग्राहकांना आनंद लुटता आला. मार्गशीर्ष गुरुवारी चौरंगावर तांदूळ पसरवून त्यावर पाणी भरलेला कलश ठेवला जातो. त्यावर आंब्याची पाने लावले जातात. त्यावर श्रीफळ ठेवून देवी समजून सजवली जाते. दागिने, फुलांची वेणी घातली जाते. यासाठी पाच प्रकारची फळे, पाच प्रकारच्या झाडांची पानेही लागतात. या देवीची पूजा केली जाते. देवीभोवती आरास मांडले जाते. या व्रताचे महत्त्व सांगणारी पुस्तिका पूजेमध्ये ठेवली जाते. पूजा झाल्यानंतर पुस्तिकेत दिलेले असल्याने व्रताचे उद्यापन केले जाते.
त्यामुळे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असल्याने बुधवारी शृंगारतळी बाजारपेठेत फळे व फुलांना मागणी वाढली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 26/Dec/2024














