खेड : तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यावर भर देत अभियान यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. या अभियानांतर्गत ग्रामस्थांना इलेक्ट्रीक वाहन वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सरपंच सुनील मोरे, उपसरपंच नामदेव सोंडकर, ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष सुधीर मोरे यांनी इलेक्ट्रीक वाहन वापराबाबतचे फायदे ग्रामस्थांना पटवून दिले. या उपक्रमास गावातील सर्वच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र इंगळे, दीपाली मोरे, पुष्पा मोरे, नेहल मोरे, कांचन मोरे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायतीने आजवर राबवलेल्या उपक्रमास ग्रामस्थ, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व महिला बचतगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 26/Dec/2024











