राजापूर एसटी आगाराच्या कामाचे आज भूमिपूजन

राजापूर : राजापूर एसटी आगाराच्या इमारतीची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष निधीतून दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. २७) दुपारी एक वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

या वेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृहराज्यमंत्री योगेश कदम, उद्योग खात्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार नारायण राणे, सुनील तटकरे, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, किरण सामंत आदी उपस्थित राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 27-12-2024