उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पाली ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाली युवा मंच आणि शिवसेना व युवा सेना पाली पाथरट यांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंत्री सामंत यांचा पाली ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी पाली येथे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

पाली युवा मंच आणि शिवसेना व युवा सेना पाली पाथरटच्या वतीने रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेचा प्रारंभ ना. सामंत यांचे वडील आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ गराटे, माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, पाली गावचे खोत संतोष सावंतदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

दि. २५ डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्ताने भव्य सत्कार ना. उदय सामंत यांचा करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या या सत्काराबद्दल ना. सामंत यांनी सर्वांचे आभार मानले. पाली युवा मंचचे अध्यक्ष अमेय वेल्हाळ, पाली विभागप्रमुख सचिन उर्फ तात्या सावंत, गणेश चव्हाण, पाली उपसरपंच संतोष धाडवे, मनोज पांचाळ, मनिष सावंत, अतुल सावंत, संतोष सावंतदेसाई आदींनी या कार्यक्रमाच्या आयोजनात व सत्कार समारंभात विशेष मेहनत घेतली. २६ रोजी रात्री मुंबई येथील कोकणातील पारंपरिक नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 27/Dec/2024

Shanti 3