रत्नागिरीत नाताळ सण उत्साहात साजरा

रत्नागिरी : जगात्य शांतीचा मार्ग देणाऱ्या येशु ख्रिस्तीचा जन्म ‘नाताळ’ सण बुधवारी (ता. २५) जिल्ह्यात मोठ्या उत्साहात करण्यात आला. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना केली.

नोकरी व्यवसायासाठी शहरात व जिल्ह्यात आलेले ख्रिस्ती बांधव स्थायिक आहेत, नाताळनिमित्त शहरातील भाजीमार्केट परिसरात असलेल्या मिलाग्रीस चर्चवर विशेष रंगरंगोटी करण्यात, तसेच ख्रिसमस ट्रीला विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. तसेच चर्चच्या परिसरात येशूची जन्मकहाणी सांगणारा गोटा तयार केला आहे. नाताळला पहाटे जिल्ह्यातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्तीबांधवांनी येशूला शरण जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर सांताक्लॉजने खाऊवाटप केले. त्यानंतर ख्रिस्ती बांधवांच्या गाठीभेटीचा कार्यक्रम झाला. शहरातील सेन्ट थॉमस चर्च-कारवांची वाडी, आयपीसी चर्च औनगर कारवांचीवाडी, न्यू लाईफ चर्च हनुमान नगर मिरजोळे, रोफे मिनिस्ट्री उद्यमनगर, ऐजी चर्च टीआरपी अशा सात ठिकाणी ख्रिश्चन बांधवांनी पहाटे प्रार्थना केली.

ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणानिमित्त शहरातील बाजारपेठाही सजल्या होत्या. बाजारात विविध वस्तू विक्रीला आल्या होत्या. त्यामध्ये ख्रिसमस ट्री, विद्युत माळा, फुलांच्या माळा, घंटा, चांदण्या, सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या, चॉकलेट्स, भेटवस्तू यांचा समावेश होता. जिल्ह्यात बुधवारी (ता. २५) येथील बांधवांनी नाताळ सण शांततेत व उत्साहात साजरा केला.

जिल्ह्यात १४ चर्च
चिपळूण २. दापोली-२. लांजा १. खेड-२, रत्नागिरी-७ असे एकूण १४ जिल्ह्यात चर्च आहेत. नाताळला पहाटे सर्व चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव येशूला शरण जाऊन प्रार्थना करतात, त्यानंतर सांताक्लॉज खाऊवाटप करतो. यानिमित्त ख्रिस्ती बांधवांचे गाठीभेटीचा कार्यक्रम होतात.

Tata sierra

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 27/Dec/2024