अमित शहा यांच्या विरोधात रत्नागिरीत मोर्चा

रत्नागिरी : अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशा घोषणा देत आंबेडकरवादी व महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी आंबेडकरवादी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबाबत काढलेल्या अनुद्रारावरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आला. तेथे सर्वपक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडत शहा यांच्यावर टीका केली व राजीनाम्याची मागणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 27/Dec/2024

Shanti2