संगमेश्वर : कुरधुंडा येथे डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; तरुण गंभीर

संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या म्हात्रे कंपनीच्या डंपरने दुचाकीस्वाराला समोरून जोरदार धडक देत चिरडल्याची घटना गुरुवारी दुपारी २:३० वा.घडली आहे.

दुचाकीस्वाराच्या पायावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ग्रामस्थ जमा झाले. संतप्त जमावाने डंपर चालकाला चोप दिला.

या अपघातात रत्नागिरीतील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. आकिब इबजी (मजगाव, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मुंबई गोवा महामार्गावर म्हात्रे कंपनीकडून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. म्हात्रे कंपनीतील डंपर चालकांचा मुजोरपणा दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीस्वार (एमएच ०८ एई ६९४१) या दुचाकीवरून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. यावेळी संगमेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या म्हात्रे कंपनीच्या या डंपरने दुचाकीस्वाराला विरुद्ध दिशेला जाऊन जोरदार ठोकर दिली.

Infigo Eyecare

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 27-12-2024