रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत उद्यापासून रत्नागिरीत

रत्नागिरी : इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत हे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत रत्नागिरीच्या साळवी स्टॉप येथील इन्फिगो हॉस्पिटलममध्ये डोळ्यांच्या पडद्याची समस्या असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात पूर्णवेळ रेटिनातज्ज्ञ उपलब्ध नसल्याने इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने ही सुविधा गेल्या चार वर्षांपासून सुरू केली आहे. याअंतर्गत शंकर नेत्रालय (चेन्नई) येथून प्रशिक्षित रेटिनातज्ज्ञ डॉ. कामत यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रिया केली आहे. डायबेटिस झालेल्या रुग्णांच्या डोळ्यांच्या पडद्याची तपासणी डॉ. कामत करणार आहेत. रक्तातील अनियंत्रित साखर डोळ्यांवर परिणाम करते. त्याचा परिणाम म्हणजे दृष्टी पटल किंवा रेटीनाला सूज येते, पडद्यावर रक्तस्त्राव होतोजिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील जनतेने या सुविधाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 27-12-2024