रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी या संस्थेत २७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या तंत्रप्रदर्शनामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व व्यवसायातील प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे. या प्रदर्शनाचा रत्नागिरीतील सर्व शाळा तसेच कॉलेज यांनी सकाळी ११ ते दुपारी २ वा. या वेळेत तंत्रप्रदर्शन लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सी. आर. शिंदे, पी. जी. कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 27/Dec/2024












