रत्नागिरी : गुरुवार दि. 26 डिसेंबर 2024 रोजी शासकीय जलतरण तलाव, साळवी स्टॉप रत्नागिरी येते झालेल्या आ. उदयजी सामंत उद्योगमंत्री, यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या खेळाडूंनी 140 पदकांची कमाई केली.
करण मिलके (2पदके ), तनया मिलके (2पदके ), आयुष काळे (12 पदके, 2 चॅम्पियन ट्रॉफी ), निधी भिडे (22पदके, 2 चॅम्पियन ट्रॉफी),रुद्र दरेकर ( 9 पदके ), श्रीयश विलणकर (10पदके ), चैतन्य कदम 8पदके ),कार्तिकी भुरवणे (16 पदके ), मीरा भुरवणे (5 पदके ), अरणा देवळेकर (2पदके ), शार्वी कळंबटे (2पदके ), ओम माळी (1 पदक ), नित्या सावंत (2पदके ), रुद्र सरफरे (4पदके ), संस्कृती जाधव (3 पदके ), अधीश जाधव (3पदके ), निल पाडळकर (1पदक ), अर्चित कंगुटकर (2पदके ), प्रणव मालवणकर (1पदक ), मिहीर दळवी (2पदके ), इरा शेठ (3 पदके ), श्रीशा शिंगाडे (3 पदके ), कस्तुरी दळवी (2पदके ), स्वरा खांबे (4 पदके ), अजिंक्य खांबे (1पदक ), श्रीशा भुजबळराव (1पदक ), अर्णव पिलणकर (4पदके ), ज्योतीरादित्य पवार (1पदक ).
सदर खेळाडूंना राष्ट्रीय जलतरणपटू व राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रशिक्षक श्री. महेश मिलके सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून रत्नागिरी मधील सर्व स्तरावरून महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या खेळाडूंचे तसेच प्रशिक्षक महेश मिलके सर व सौ. गौरी महेश मिलके मॅडम यांचे जलतरण क्षेत्रात करत असलेल्या क्रांती बद्दल खूप अभिनंदन करण्यात येते आहे. तसेच लवकरच रत्नागिरी चे नाव ऑलिम्पिक खेळात उंचावेल याची आशा महेश मिलके स्विमिंग ग्रुप कडून असल्याचे सांगण्यात येते आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 27-12-2024














