दापोली : लाठीकाठी फिरवण्याचा विश्वविक्रम

दापोली : डोळ्यांची पापणीदेखील झुकण्याची संधी न देता ७५ खेळाडूंचे अत्यंत सराईतपणे सुरू असलेले लाठीकाठी फिरवण्याचे प्रकार पाहिल्यानंतर उपस्थितांनी अक्षरशः श्वास रोखून धरला होता. त्या खेळाडूंनी सलग एक तास, एक मिनिट आणि एक सेकंद कालावधीसाठी लाठीकाठी फिरवली आणि विश्वविक्रम केला. यासाठी युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे एशिया चीफ एडिटर सबाब्बी मंगल हे दापोलीत विश्वविक्रमावेळी उपस्थित होते.

शिवकालीन शस्त्र परंपरेमधील प्रथम शस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाठीकाठीचा आता भारतीय क्रीडा प्रकारांत समावेश होऊ लागला आहे. मागील काही वर्षापासून अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर, तसेच काही प्रमाणात आंतरराष्ट्रीयस्तरावरही या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या खेळाकडे समस्त क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधण्यासाठी आणि महाराष्ट्राची शिवकालीन परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी दापोलीत या खेळाच्या एका वेगळ्या विश्वविक्रमाचे आयोजन केले. रत्नागिरी जिल्हा लाठीकाठी सुगर्ट असोसिएशन यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. संपूर्ण कोकण विभागातील पालघर ते सावंतवाडीपर्यतच्या जवळपास विश्वविक्रमामध्ये सहभाग घेतला होता. या सर्व ७४ खेळाडूंनी मिळून सलग ७६ तास लाठीकाठी फिरवण्याच्या विश्वविक्रमावर नाव कोरले आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध आणि काटेकोर मूल्यमापनासाठीही प्रसिद्ध असणाऱ्या युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली जागतिक विक्रमवीर आणि मार्शल आर्टचे प्रशिक्षक राजेश शिवाजी ठाकूर यांची उपस्थितीही खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देणारी ठरली.

या क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी जवळपास पाचशे क्रीडाप्रेमी आझाद मैदानावरील बॅडमिंटन हॉलमध्ये उपस्थित होते. या विश्वविक्रमासाठी शेवटच्या एका मिनिटासाठी काऊंटाऊन सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने हॉल दुमदुमून गेला. त्यानंतर विश्वविक्रमाची घोषणा झाल्यानंतर खेळाडूंनी जल्लोष केला. या वेळी पद्यत्री दादा इदाते, नगराध्यक्षा ममता मोरे, रत्नागिरी जिल्हा लाठी काठी असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव पाटील, पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे, लाठीकाठी जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रमागपत्र आणि मेडल देऊन सहभागी खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

शिंदे दांपत्याचे प्रयत्न सफल
दरम्यान, यासाठी पुढाकार घेणारे या शिवकालीन क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे आणि राष्ट्रीय स्तरावर या खेळाच्या निर्णायक पंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविता शिंदे हे दांपत्य गेले दोन वर्षे यावर काम करत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 27/Dec/2024