पत्रकार दिनानिमित्त लांजात निबंध स्पर्धेचे आयोजन

लांजा : मराठी पत्रकार परिषद लांजा शाखेच्या वतीने व पत्रकार स्व. जगदीश कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त लांजा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

निबंध स्पर्धा लांजा तालुक्यातील शालेय स्तरावर होणार असून, प्राथमिक गट इयत्ता ४ थी ते ७ वी तर माध्यमिक गट इयत्ता ८ वी ते १० वी असा असणार आहे. निबंधासाठी प्राथमिक गट भारतातील विज्ञान भरारी, मी आणि माझी आदर्श शाळा, वाचन चळवळीतून समृद्धीकडे व माध्यमिक गटासाठी लांजा तालुका- काल, आज आणि उद्या, नव्या शैक्षणिक धोरणातील आजचा विद्यार्थी, महिला सक्षमीकरण काळाची गरज असे विषय स्पर्धकांना देण्यात आले आहेत. निबंध १५० ते २०० शब्द मर्यदापर्यंत असावा. विजेत्यांना रोख रुपये १ हजार १११, ७७७, ५५५ व प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३ जानेवारी असून, संतोष कोत्रे यांच्याकडे जमा करावे व अधिक माहितीसाठी प्रवीण कांबळे, नसीर मुजावर, ऋषिकेश बेर्डे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष सिराज नेवरेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 27/Dec/2024