मुंबई : मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांच्या वितरणानंतर सुरू झालेले नाराजीनाट्य दूर करण्यासाठी प्रशासनाची कसरत सुरू आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र आणि महायुती सरकारमधील राज्यमंत्री योगेश कदम यांना विधान भवनातील दालनाऐवजी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच आशिष जैस्वाल यांनाही मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे असलेले मंत्रालयातील ३१७, ३१९ आणि ३२१ क्रमांकाचे दालन आता राज्यमंत्री जैस्वाल यांच्याकडे देण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 27/Dec/2024












