चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाने डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय आर्थिक गुंतवणुकीबाबत राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच झाली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक गुरुदत्त आजगावकर यांनी भारतीय सुजाण नागरिकांसह महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्याथ्यनि गुंतवणुकीबाबत सतर्क राहून आर्थिक साक्षरतेचे पूर्ण ज्ञान घेत कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन करताना गुंतवणुकीतील जोखीम, भविष्यातील निकड लक्षात घेऊन करावयाचे नियोजन, यातील विविध बारकावे स्पष्ट केले. यावेळी मार्गाताम्हाने शिक्षण संस्थेचे सचिव मोहन चव्हाण, प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव, समन्वयक डॉ. संगिता काटकर, उपप्राचार्य अनिल कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी एकूण ६१ विद्यार्थांनी नोंदणी केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 27/Dec/2024












