गुहागरमध्ये उद्यापासून सरस महोत्सव

गुहागर : उमेदअंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरी व गुहागर पंचायत समितीतर्फे ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री गुहागर पोलिस कवायत मैदानावर २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत सरस महोत्सवाचे आयोजन केले आहे.

सरस महोत्सवामध्ये विविध कलात्मक वस्तू, कोकणी मसाले, कोकणी मेवा, कोकणी खाद्यसंस्कृती दालन असणार आहेत. २८ डिसेंबरला दुपारी ४ ते ७ वा. पर्यंत संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात येणार आहे. २९ ला सायंकाळी ७ ते १० रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ३० ला सायंकाळी ५ ते ७ फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ३१ डिसेंबरला सायंकाळी ७ ते ८.३० मंगळागौर, कोळी नृत्य, रात्री ९ वा. नमन सादर होणार आहे. सरस महोत्सवाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन उमेद-तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातर्फे केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:19 27-12-2024

Shanti real estate 1