सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांची मदत घेणार : जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावर लाखो पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक मच्छिमारांची मदत घेणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.

महिलांची छेडछाड झाल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. नवीन वर्ष आनंदात आणि सुरक्षितेत साजरे करण्याचे आवाहनदेखील अधीक्षकानी केले.

पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणी दाखल होतात. सर्व पर्यटकांची सुरक्षा हा जिल्हा प्रशासनाचा महत्वाचा मुद्दा असून कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच समुद्रात पोहण्यासाठी व आनंद साजरा करण्यासाठी गेल्यानंतर पाण्यात बुडण्यासारखे प्रकार होऊ नयेत, त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 27-12-2024